Realme 11 Pro Plus 5g स्मार्टफोन २००mp Powerful कॅमेरा, ५०००mAh बॅटरी व १००w फास्ट चार्जिंगसह भारतात सादर

Realme ने Realme 11 Pro Plus 5g सह Realme 11 Pro 5g हे दोन फोन भारतात सादर केले आहेत. पाहूयात या फोनचे फीचर्स.

कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स देणाऱ्या Realme या स्मार्टफोन कंपनीने आज भारतात Realme 11 Pro सिरीज लाँच केली आहे. यामध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro Plus हे दोन नवीन फोन लाँच करण्यात आले आहेत. या फोनचे डिझाईन खूपच प्रिमीयम आहे. Realme 11 Pro Plus मध्ये 200-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि 100w Supervooc फास्ट चार्जिंग सह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Realme 11 pro plus 5g

📌 कॅमेरा

  • Realme 11 Pro Plus 5G चा कॅमेरा हेच या फोनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हा 1/1.4″ एक्स्ट्रा लार्ज सेन्सर आहे.
  • जो 2.24μm फ्यूजन लार्ज पिक्सल सोबत येतो.
  • तसेच याचा कॅमेरा 22.9mm फोकल लेंथ तसेच 85 डिग्रीच्या फिल्ड व्यूसह (FOV) येतो.
  • यामध्ये Samsung HP3 Super Zoom लेन्स वापरली आहे जो f/1.69 अपर्चरवर चालतो.
  • तसेच हा स्मार्टफोन तीन कॅमेरांच्या सेटअप सह येतो. यामध्ये f/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.
  • सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Realme 11 Pro Plus 5g फोनमध्ये f/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • Realme 11 Pro 5g या फोनमध्ये १०0 मेगापिक्सेलचा f/1.8 अपर्चर व २६ एमएम वाईड अँगल असणारा कॅमेरा दिलेला आहे.
  • या फोनमध्ये पाठीमागच्या बाजूला २ कॅमेरे देण्यात आले आहेत. दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा f/2.4 अपर्चर असलेला मॅक्रो कॅमेरा आहे.
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये ओआयएसचा सपोर्ट आहे, त्यामुळे व्हिडीओ खूप स्टेबल येतात.
  • या फोनमध्ये मूनशॉटचा सुद्धा पर्याय देण्यात आला आहे. ज्यामुळे आपण चंद्राचा फोटोसुद्धा अगदी क्लिअर घेऊ शकतो.
  • कमी प्रकाशातसुद्धा या फोनद्वारे आपण चांगले फोटो काढू शकतो.
  • मागच्या कॅमेराद्वारे आपण ४k 30fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.
  • सेल्फी कॅमेराने 1080 30fps व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. ४k रेकॉर्डिंग करता येत नाही.
Realme 11 Pro Plus 5g

📌 डिस्प्ले

  • Realme 11 Pro Plus 5g या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा कर्व्ड फुलएचडी+ सह येणारा पंच-होल प्रकारचा आहे.
  • या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x 2412 पिक्सल आहे.
  • 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे.
  • हा अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे.
  • 2160 हर्ट्झ पीडब्ल्यू डिमिंग,
  • 1260 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट,
  • एचडीआर १० प्लसचे सर्टीफिकेशन
  • ९५० निट्स ब्राईटनेस असल्यामुळे प्रखर उजेडातसुद्धा व्यवस्थित दिसेल.
  • 100% DCI-P3 कलर गॅमट
  • आय केयर असे अनेक फीचर्ससह या फोनचा डिस्प्ले येतो.
  • हा डिस्प्ले पाहण्याचा अनुभव आनंददायक बनवतो.
Realme 11 Pro Plus 5g

📌प्रोसेसर

  • Realme 11 Pro Plus 5g ह्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 6nm फॅब्रिकेशनवर बनलेला आहे.
  • हा प्रोसेसर 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
  • ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी68 हा जीपीयू देण्यात आला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित असणारी रियलमी युआय 4.0 आहे.
  • Realme 11 Pro+ 5G फोनमध्ये 8जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
  • यामध्ये एक्सपांशन टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपण इंटरनल फिजिकल रॅममध्ये एक्स्ट्रा 8जीबी रॅम वाढवू शकतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता आणखी वाढते.
Realme 11 Pro Plus 5g

📌 बॅटरी

  • Realme 11 Pro+ 5G हा फोन 5,000एमएएचच्या दमदार बॅटरीसह येतो.
  • यामध्ये 100वॉट सुपरव्हूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ज्यामुळे आपण ३० मिनिटांच्या आत पूर्ण बॅटरी चार्जिग करू शकतो.
  • कंपनीच्या मते ३ मिनिटांत हा मोबाईल 17 टक्के चार्ज होऊ शकतो.

📌 डिझाईन

  • Realme 11 Pro Plus 5g मोबाईल हा अतिशय प्रिमीयम डिझाईनसह येतो.
  • यामध्ये पाठीमागे वेगन लेदर देण्यात आले आहे.
  • पुढच्या बाजूला अतिशय कमी बेझेल्स असणारी कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे.
  • Sunrise Beige, Oasis Green, Astral Black या तीन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
  • Gucci या नामांकित कंपनीमध्ये काम केलेल्या डिझाईनरने या फोनचे डिझाईन तयार केले आहे.
  • ड्युअल सिमचा सुद्धा पर्याय दिलेला आहे. पण हा हायब्रीड प्रकारचा आहे. ज्यामध्ये आपण १ सिम व 1tb पर्यंत मायक्रोएसडी कार्ड किंवा २ फिजिकल सिम वापरू शकतो.
  • टाईप सी पोर्ट आहे.
Realme 11 Pro Plus 5g

📌 इतर फीचर्स

  • Realme 11 Pro+ 5g मोबाईलमध्ये 5g चे 7 बँड्स वापरता येतात.
  • हा ड्युअल मोड SA/NSA 5Gला सपोर्ट सपोर्ट करतो.
  • या स्मार्टफोनमध्ये 4जी एलटीई पण आहे.
  • या फोनमध्ये एनएफसी सुद्धा मिळते.
  • फिंगरप्रिंट स्क्रीनवरच आहे.
  • AnTuTu Score 5,50,000 पेक्षा जास्त आहे.
  • बॉक्समध्येच तुम्हाला १००वॉट मिळतो. Realme 11 Pro 5g मोबाईलच्या बॉक्समध्ये ६७वॉट चार्जर मिळतो.

📌 किंमत

  • Realme 11 Pro 5g स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २3,९९९ रुपये आहे.
  • 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २4,९९९ रुपये आहे.
  • Realme 11 Pro Plus 5g स्मार्टफोन 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २7,९९९ रुपये आहे.
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २9,९९९ रुपये आहे.
  • फ्लिपकार्ट व Realme या दोन्ही वेबसाईटवर १४ जून पर्यंत प्रीबुकिंग करता येईल.
  • HDFC व SBI च्या क्रेडीट व डेबिट कार्ड १००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

हे पण वाचा

Realme 11 Pro Plus 5g मोबाईल कधीपासून विकत घेता येईल?

१६ जून २०२३