Budget Google Pixel 7a Launched in India | गुगलचा Pixel 7a भारतात दाखल

Googel Pixel 7a ची वैशिष्ट्ये

Google Pixel 7a Launched in India. आज गुगलचा Pixel 7a भारतात दाखल झाला आहे. या Google Pixel 7a ची वैशिष्ट्ये तसेच त्याची किंमत आपण आज या लेखात पाहणार आहोत. हा फोन भारतात लॉंच होईल की नाही याची खूपच चर्चा सुरु होती. या फोनबद्दल खूपच उत्सुकता होती. तर पाहूयात या फोनची वैशिष्ट्ये.

प्रोसेसर

या फोनमध्ये गुगलची स्वतःची Tensor G2 चीप असून त्यासोबतच Titan M2 सेक्युरिटी चीप देण्यात आलेली आहे. हा प्रोसेसर 5nm चा आहे. हा एक दमदार प्रोसेसर आहे तसेच गुगल स्वतः प्रोसेसिंग मध्ये AI चा वापर करून कार्यक्षमता वाढवते.

Google Pixel 7a Launched in India

Google Pixel 7a Launched in India

कॅमेरा

Google Pixel कॅमेरा फोन म्हणूनच ओळखला जातो. यावर अप्रतिम फोटोग्राफी करता येऊ शकते. यासाठी यामध्ये ६४ मेगापिक्सेलचा सोनीचा (IMX787) मेन कॅमेरा असून तो OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन) सोबत येतो. त्यामुळे फोटो व व्हिडीओ खूप स्टेबल येतात. तसेच या फोनवर फोटो काढून ते झूम करून पाहिले तरी चांगले दिसतील अशा पद्धतीने गुगल प्रोसेसिंग करतो. या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा FOV (Field of View) 120 डिग्री अल्ट्रा वाइड कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे.

सेल्फी कॅमेरा पण 13 मेगापिक्सेलचा असून FOV 90 डिग्री असल्यामुळे मोठ्या ग्रुपचा सुद्धा सेल्फी काढता येईल. दोन्ही बाजूच्या कॅमेराने आपल्याला 4k रेकॉर्डिंग करता येते. मागच्या कॅमेराने 4k 60fps व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात तर फ्रंट कॅमेराने 4k 30fps व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. गुगलच्या पिक्सेल फोनमध्ये Magic Eraser चा सुद्धा पर्याय आहे, ज्यामुळे आपल्याला फोटोमध्ये नको असलेला भाग काढून टाकता येतो. एखादा फोटो ब्लर आला असेल तरी त्याला क्लिअर करता येते. यामध्ये खालील सर्व पर्याय पाहायला मिळतात.

  • Portrait Mode
  • Real Tone
  • Portrait Light
  • Magic Eraser
  • Face Unblur
  • Manual White Balancing
  • Locked Folder
  • Night Sight
  • Top Shot
  • 8x Super Res Zoom
  • Motion Autofocus
  • Dual Exposure Controls
  • Live HDR+
  • Cinematic pan

Read also :- Vivo X90 Pro

डिस्प्ले

या फोनचा डिस्प्ले ६.१ इंचाचा पंच होल प्रकारचा असून तो ओलेड आहे. खूप लहान पण नाही आणि खूप मोठा पण नाही. Full HD+ रिझोल्यूशन आहे. हा ९०Hz रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले आहे. त्यामुळे स्क्रोल करताना, गेम खेळताना खूप Smooth वाटेल. डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर पाहायला मिळतो. सोबत कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन आहे. एचडीआर व्हिडीओ सुद्धा आपण यावर पाहू शकतो. पाठीमागची बाजू प्लास्टिकची असल्यामुळे बोटांचे ठसे उमटतात. फ्रेम अल्युमिनियमची पाहायला मिळते. मेटल फ्रेममुळे बिल्ड क्वालिटी चांगली आहे. पण बेझेल थोडे मोठे वाटतात.

बॅटरी

यामध्ये आपणास 4835mAh ची बॅटरी दिलेली आहे. हा फोन 18w ने फास्ट चार्जिंग करू शकतो. चार्जर सोबत मिळत नाही. Pixel 7a फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सुद्धा देण्यात आलेले आहे. IP67 रेटींग असल्यामुळे पाण्यात सुद्धा चालतो.

किंमत

हा फोन 8gb रॅम व 128gb स्टोअरेज या एकाच व्हेरीयंट मध्ये उपलब्ध असून ११ मे पासून तो 43,999 रुपयांना फ्लिपकार्टवर मिळेल. पहिल्या सेल मध्ये HDFC चे कार्ड वापरले तर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट सुद्धा मिळेल. डिस्काउंट नंतर या स्मार्टफोनची किंमत ३९,९९९ रुपये होते.

Read also :- Google Pixel 7a ची भारतात एंट्री! पहिल्या सेलमध्ये मिळणार थेट 4 हजारांची सूट

इतर वैशिष्ट्ये

  • या स्मार्टफोनमध्ये 8gb LPDDR5 रॅम देण्यात आली असून 128gb 3.1 स्टोअरेज आहे.
  • गुगल पिक्सेल ७a फोन तीन रंगात उपलब्ध आहे. यामध्ये चारकोल (Charcoal), स्नो (Snow) आणि सी (Sea) असे कलर पाहायला मिळतात.
  • या फोनचे वजन 193.5gm आहे.
  • हा फोन ड्युअल सिम असला तरी फोनमध्ये एक सिम बसते, तर दुसरे ईसिम म्हणून वापरावे लागते.
  • वायफाय ६e
  • ब्ल्यूटूथ 5.3
  • स्टेरीओ स्पीकर्स आहेत त्यामुळे म्युझिक ऐकायचा आनंद वाढणार आहे.
  • एनएफसी
  • Clean Android 13
  • 5g चे जवळपास सर्व बँड्स उपलब्ध आहेत.
  • Wifi कॉलिंग
  • Antutu Score 7 लाखापेक्षा जास्त

गुगलची पिक्सेल फोनची जी A सिरीज आहे ती कमी किंमतीत मिळते. गुगलच्या पिक्सेल फोनवर सर्वात आधी Android चे अपडेट्स पाहायला मिळतात. गुगल पुढील ३ ओएस अपडेट तसेच ५ वर्षे सेक्युरिटी अपडेट सुद्धा देणार आहे.

Google Pixel 7a लाँच होताच Pixel 6a वर तब्बल १७,००० हून अधिकची सूट मिळत आहे. त्यामुळे आत्ता Google Pixel 6a बँक ऑफरच्या फायद्यासह 25,000 रुपयांना मिळू शकतो. एवढ्या कमी किंमतीमध्ये हा फोन खूप चांगला आहे. तसेच जर तुम्ही Google Pixel 7a आत्ता लगेच घेऊ इच्छित असाल तर तो थोडा जास्त किंमतीचा वाटतो. दसरा दिवाळीच्या वेळी तुम्हाला या फोनवर सुद्धा चांगला डिस्काउंट मिळू शकतो. 7 ते 10 हजारपर्यंतचा फायदा तुम्हाला तेव्हा होऊ शकतो.

Google Pixel 7a फोनची किंमत किती?

43,999Rs

Google Pixel 7a फोन भारतात कधीपासून मिळेल?

11 मे 2023 पासून