Motorola Edge 40 मध्ये IP68 रेटींग व 5g च्या 14 बँड्ससह मिळतात आणखी जबरदस्त फिचर्स
Motorola Edge 40 हा भारतातील पहिलाच स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 या चिपसेटसह येतो. यासह आणखी अनेक अॅडव्हान्स फीचर्स असलेल्या मोटोरोला एज 40 ची बाकीचे फिचर्स आपण खाली पाहू..
Table of Contents
प्रोसेसर
Motorola Edge 40 या स्मार्टफोनमध्ये भारतात पहिल्यांदाच मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेट देण्यात आली आहे. Mediatek Dimensity 8020 हा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो 2.6 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali-G77 MC9 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर लाँच करण्यात आला आहे. ज्यात 2 ओएस अपडेट तसेच 3 वर्ष सिक्युरिटी अपडेट मिळणार आहेत. या स्मार्टफोनची ओएस क्लीन अँड्रॉइड वर आधारित आहे. ज्यामुळे नको असलेले तसेच अॅड येणारे अॅप यामध्ये पहिल्यापासून इंस्टाल केलेले नसतात.
8 जीबी LPDDR4x रॅम व 256 जीबी 3.1 स्टोरेजसह या एकाच व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे.
स्क्रीन
Motorola Edge 40 मध्ये 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असून तो 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले पीओएलईडी (pOLED) पॅनलवर बनलेला 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनचा आहे. यामध्ये फोनच्या सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
ह्या फोनमध्ये 144हर्ट्झ रिफ्रेश रेट असून 360हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट मिळतो. ज्यामुळे गेमिंग खूपच smooth होईल आणि ऍप वापरणे सुद्धा जलद होईल. एज 40 ची स्क्रीन 1200निट्स ब्राइटनेस देते, ज्यामुळे प्रखर उजेडात सुद्धा मोबाईल पाहण्यात काहीच अडचण येणार नाही. त्याचबरोबर हा डिस्प्ले एचडीआर10+ सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.
Read also :- Lava Agni 2 5g स्मार्टफोन
कॅमेरा
Motorola Edge 40 फोनमध्ये मागच्या बाजूला दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यापैकी मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर असणारा एफ/1.4 अपर्चरसह देण्यात आला आहे. हा ओआयएस सोबत येतो. त्यामुळे व्हिडीओ स्टेबल येतात. तसेच रात्री सुद्धा खूप चांगल्या डिटेलसोबत फोटो येतात. त्यासोबत 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड 120 अँगल लेन्ससह येतो जो मॅक्रो व्हिजनला सुद्धा सपोर्ट करतो. हा एफ/2.2 अपर्चरसह मिळतो.
या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे. मागच्या व पुढच्या दोन्ही कॅमेरासोबत आपण 4k 30fps पर्यंत व्हिडीओ शुटींग करू शकतो आणि फुल एचडी 60fps व्हिडीओ शूट करू शकतो.
सोबत खूप सारे कॅमेरा ऑप्शन देण्यात आले आहेत. Horizon Locking या ऑप्शन मुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा फोटो काढत असताना मोबाईल उलटा केला तरी व्यक्ती सरळच दिसेल. सोबत स्लो मोशन, टाईम लॅप्स, पोर्ट्रेट, मॅक्रो, ड्युअल कॅप्चर यासारखे आणखी फीचर्स मिळतात.
बॅटरी
Motorola Edge 40 मध्ये 4,400एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी तुम्हाला दिवसभर चालेल. फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. मोबाईलच्या बॉक्स मध्येच बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 68w चा टर्बो पॉवर चार्जर देण्यात आला आहे. दोन्ही बाजूला टाईप सी पोर्ट असणारी केबल सुद्धा मिळते. तसेच हा मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीच्या मते फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो.
डिझाईन
हा स्मार्टफोन एक्लिप्स ब्लॅक, लूनार ब्लू आणि नेबुला ग्रीन या तीन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यापैकी नेबुला ग्रीन कलर आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला वेगन लेदर देण्यात आले आहे. त्यामुळे हा फोन खूपच प्रिमीयम वाटतो. या फोनची फ्रेम मेटलची (अल्युमिनियम) असल्यामुळे बिल्ड क्वालिटी खूपच छान आहे. या फोनमध्ये एक फिजिकल सिम चालते तसेच एक ई-सिमचा सुद्धा सपोर्ट आहे. या सेगमेंट ई-सिमचा सपोर्ट असणारा पहिला मोबाईल आहे.
इतर फीचर्स
- Motorola Edge 40 मोबाईलमध्ये वायफाय ६, ब्लूटूथ ५.२, ४g VoLTE आणि NFC सुद्धा देण्यात आले आहे.
- सिक्युरिटी साठी ThinkShield Security येते. यामध्ये आपण प्रायव्हेट फोल्डर बनवू शकतो.
- Moto Secure मुळे आपण ज्या वायफायला आपला मोबाईल कनेक्ट करतो तो सुरक्षित आहे की नाही ते कळते.
- Ready For फिचरमुळे आपण आपला मोबाईल मोठ्या स्क्रीनवर सहज कास्ट करू शकतो.
- Dolby Atmos सोबत स्टेरीओ स्पीकर येतात, त्यामुळे व्हिडीओ पाहायला आणि गाणी ऐकायला खूपच छान वाटणार आहे.
- मोबाईलच्या मागे कॅमेराजवळ असणारा माईक लांब सुरु असणाऱ्या व्हिडीओचा आवाज व्यवस्थित रेकॉर्ड करू शकतो.
- IP68 रेटींग असल्यामुळे पाण्यात सुद्धा वापरता येतो.
Motorola Edge 40 ची किंमत
मोटोरोला एज 40 स्मार्टफोन भारतात 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Motorola Edge 40 ची किंमत 29,999 रुपये आहे. हा फोन येत्या 30 मे 2023 पासून फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल. या फोनवर २००० रुपये एक्स्जेंज ऑफर मिळणार आहे त्यामुळे या हा मोबाईल तुम्हाला 27,999 रुपयांना मिळू शकतो.