माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | Majhi Kanya Bhagyashree Yojana started by Maharashtra Government to promote girls education

माझी कन्या भाग्यश्री योजना महत्वपूर्ण माहिती

To promote girls education Maharashtra Government started Majhi Kanya Bhagyashree Yojana. आज आपण “माझी कन्या भाग्यश्री” सुधारित योजना 2023 याविषयी असणारी महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास या विभागांतर्गत “माझी कन्या भाग्यश्री” योजना सुरू करण्यात आली आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana

“माझी कन्या भाग्यश्री योजना” या नवीन योजनेमध्ये सध्या सुरु असलेली “सुकन्या” ही योजना विलीन
करुन ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील (BPL) कुटुांबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी “सुकन्या” योजनेचे लाभ कायम ठेऊन त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत
अधिकचे लाभ देण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana

📌शासननिर्णय


महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास या विभागांतर्गत “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना सुरू करण्यात आली आहे. बालिका भ्रूणहत्या थांबविणे, मुलींच्या आरोग्याचा व शिक्षणाचा दर्जा सुधारणे, मुलींच्या जन्मासंबंधी समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत करणे ही सर्व उद्दिष्टे साध्य व्हावीत यासाठी “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. “माझी कन्या भाग्यश्री” सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू करण्यात आली.

एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये तिला देण्यात येतील. जर कुटुंबात दोन मुली असतील तर प्रत्येकी 25 हजार रुपये एवढी रक्कम शासनाकडून दिली जाईल. सदर शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक 201602261720426830 असा आहे.

Read also :- ‘ति’ च्या मनाची घालमेल

📌योजनेचे स्वरूप


ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाचा दाखला सादर करावा लागतो. एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये तिला देण्यात येतील. जर कुटुंबात दोन मुली असतील तर प्रत्येकी 25 हजार रुपये एवढी रक्कम शासनाकडून दिली जाईल. जुळ्या मुली सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मुलगी 6 वर्षाची व 12 वर्षाची झाल्यास रकमेवरील व्याज मिळेल. मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यास सर्व रक्कम व व्याज मिळेल. मुलगी व तिची आई यांचे राष्ट्रीयकृत बँकेत संयुक्त खाते उघडून अपघाती विमा 1 लाख रुपये एवढी रक्कम दिली जाईल. एक कन्या असलेल्या कुटुंबातील त्या मुलीच्या आजीआजोबांना सोन्याचे नाणे दिले जाते.

📌या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता


माझी कन्या सुकन्या या योजनेच्या अटी व नियम या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. माझी कन्या सुकन्या या योजनेतील लाभार्थी मुली “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

  1. लाभ घेणाऱ्या मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असावेत.
  2. लाभार्थी मुलीच्या पालकांनी कुटुंब नियोजन केलेले असावे.
  3. मुलीला मिळणारी रक्कम अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मिळेल, मुलगी किमान दहावी उत्तीर्ण असावी. मुलगी अविवाहित असल्यासच रक्कम दिली जाईल.
  4. दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अशा दोन्ही कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  5. लाभार्थी मुलीच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न सर्वसाधारणपणे साडे सात लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  6. एखाद्या कुटूंबाने मुलगी दत्तक घेतल्यास तिच मुलगी प्रथम अपत्य मानून तिला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  7. 1 ऑगस्ट 2017 व त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र असतील.

📌 या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

  1. मुलीचा जन्मनोंदणी दाखला
  2. पालकांनी कुटुंब नियोजन केल्याचा वैद्यकीय दाखला
  3. लाभार्थी आधारकार्ड
  4. दारिद्रय रेषा रेशनकार्ड
  5. उत्पन्न दाखला
  6. रहिवासी दाखला
  7. पालकांचा फोन नंबर
  8. मुलीचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते
  9. मुलीचा पासपोर्ट साईज फोटो

📌या योजनेसाठी असणारा अर्ज

या योजनेसाठी आवश्यक असणारे अर्ज महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, बालकल्याण विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त यांच्या कार्यालयात विनामूल्य मिळतील. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पालकांनी मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याठिकाणी जन्माची नोंद करून त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे प्रपत्र अ किंवा ब यामध्ये अर्ज सादर करावा.

Majhi Kanya Bhagyashree Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana

अर्जासोबत वडील राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र) आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला), लाभार्थी कुटुंबाने प्रकार- १ चा लाभ घ्यावयाचा असल्यास पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच दुसरे अपत्य असलेल्या मुलीसाठी अर्ज करतांना कुटुंब नियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वैदयकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावीत.

सर्वांनी ही माहिती वाचून गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविणे. शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी यामध्ये बदल केला जातो त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला नक्की भेट दया.

माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये मुलींना किती रक्कम मिळते?

५०००० रुपये

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोणत्या मुली पात्र असतील?

1 ऑगस्ट 2017 व त्यानंतर जन्मलेल्या मुली