Lava Agni 2 5g स्मार्टफोन मध्ये उत्कृष्ट डिस्प्लेसह आहेत आणखी खूप जबरदस्त फीचर्स
भारतीय स्मार्टफोन कंपनी लावानं Lava Agni 2 5G हा आपला नवीन 5जी फोन सादर केला आहे. हा मोबाइल जबरदस्त फीचर्ससह कमी किंमतीत भारतात लाँच केला आहे.
Table of Contents
एका वर्षात फोन खराब झाला तर रिप्लेस करून मिळेल यासह २ वर्षे Android Updates व ३ वर्षाच्या सिक्युरिटी अपडेटस्, फास्ट चार्जिंग सह पाहूयात या स्मार्टफोनचे आणखी फीचर्स..
डिस्प्ले
Lava Agni 2 5g स्मार्टफोनचा डिस्प्ले हा ६.७८ इंचाच्या सर्वात मोठा कर्व्ड एज एमोलेड डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. तसेच एफएचडी + स्क्रीनसह एचडीआर, एचडीआर १० आणि एचडीआर १०+ तसेच वाईडवाईन एल १ ला सुद्धा सपोर्ट करतो. त्यामुळे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर HDR कॉन्टेंटचा आनंद तुम्हाला घेता येईल. एवढ्या कमी किंमतीत १.०७ बिलियन कलर डेप्थसह हा डिस्प्ले येतो, ज्यामुळे खूपच प्रीमियम वाटतो.
तसेच तुम्हाला सेक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. स्क्रीन दोन्ही बाजूला कर्व्ह असल्यामुळे फ्लॅगशिप मोबाईलचा लुक देते.
प्रोसेसर
फोनमध्ये अत्याधुनिक 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या MediaTek चा Dimensity 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो भारतात पहिल्यांदाच वापरण्यात आला आहे. जो अतिशय वेगवान असून गेमिंगचा आनंद द्विगुणित करेल तसेच अॅप वापरणे खूप Smooth होईल. ह्यात 8जीबी रॅम (१६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट) सह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन ५जी कनेक्टिविटी सोबत येतो. यात 13 5G बँडचा सपोर्ट आहे.
यासोबतच जे भरपूर गेमिंग करतात त्यांच्यासाठी फोन गरम होऊ नये म्हणून थर्ड जेन २९०० मिमी स्क्वेअर व्हेपर चेंबर कूलिंग टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर याची हॅप्टीक्स मोटर गेमिंग आणि टायपिंगचा अनुभव वाढवतात. हा फोन लेटेस्ट क्लीन अँड्रॉइड 13 ओएससह लाँच झाला आहे.
Read also :- Google Pixel 7a
डिझाईन
हा स्मार्टफोन ड्युअल कर्व्ह्ड असल्यामुळे तो हाताळण्यास सोपा आहे. डिस्प्लेचा बॉटम बेझल फक्त २.३ एमएम इतका कमी आहे. त्यामुळे स्क्रीन टू बॉडी रेशिओ हा ९३.६५% होतो. या फोनच्या दोन्ही बाजूला ग्लास देण्यात आली आहे. पाठीमागची बाजू मॅट फिनिशसह प्रीमियम ३डी कलर ग्लास असल्यामुळे या स्मार्टफोनला खूप प्रीमियम लूक देते. अग्नी २ चा इन-हँड फील अगदी चांगला आहे.
कॅमेरा
या फोनमध्ये पाठीमागच्या बाजूला चार कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यापैकी मुख्य कॅमेरा हा सुपर ५० मेगापिक्सलचा असून १ मायक्रॉन पिक्सल सेन्सरसह येतो. हा सेन्सर अंधारातसुद्धा चांगले फोटो काढू शकतो. जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह येतो. दुसरा कॅमेरा ८ एमपीचा अल्ट्रावाईड आहे. बाकीचे दोन कॅमेरे २ २ मेगापिक्सेलचे आहेत.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइलला 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी
Lava Agni 2 5g या स्मार्टफोनमध्ये ४७००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी ६6w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जर मोबाईलसोबत बॉक्समध्येच मिळतो. हा फोन १६ मिनिटांत ५० टक्के चार्ज होतो.
किंमत
लावाने हा फोन भारतात २१,९९९ इतक्या कमी किंमतीला लॉंच केला आहे. Lava Agni 2 5g हा फोन एकाच व्हेरीयंट मध्ये २४ मे २०२३ पासून अमेझॉनवर उपलब्ध होणार आहे. कंपनीने सुरुवातीची ऑफर म्हणून बँकेच्या क्रेडीट व डेबिट कार्ड वर 2000 रुपयांचा डिस्काऊंट सुद्धा दिला आहे ज्यामुळे हा फोन तुम्हाला फक्त १९,९९९ रुपयांना मिळणार आहे.
Lava Agni 2 5g ची किंमत किती आहे?
21,999Rs
Lava Agni 2 5g मोबाईल कधीपासून आणि कुठे मिळेल?
२४ मे २०२३ पासून अमेझॉनवर