घटना समितीची प्रक्रिया | संविधान सभा

*संविधान सभा (पार्श्वभूमी) :-

1946 च्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या मदतीने ‘संविधान सभा’ स्थापना करण्यात आली. भारतासाठी योग्य संविधान तयार करण्याचे काम संविधान सभेने केले.

घटना समिती

*संविधान सभा :-

“लोकशाही देशाच्या राज्यघटनेवर चर्चा करून ती मान्य करण्याच्या हेतूने लोकांनी निवडून दिलेल्या सभेला ‘संविधान सभा’ म्हणतात.”

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली होती.

*संविधान सभेची मागणी :-

भारतासाठी संविधान सभा/ घटना परिषद ही कल्पना मांडण्याचे श्रेय भारताचे साम्यवादी चळवळीचे प्रणेते, पुरोगामी लोकशाहीवादाचे समर्थक डॉ. मानवेंद्रनाथ रॉय यांना जाते.

*संविधान सभेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण विचार/ चर्चा/ निर्णय

  • सन 1922 – महात्मा गांधीनी सर्वांत प्रथम संविधान सभा असा शब्द न वापरता अशा सभेची मागणी केली.
  • सन 1934 – सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची मागणी केली.
  • सन 1934 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पाटणा येथील बैठकीत घटनात्मक सुधारणांचा अहवाल नाकारून संविधान सभेची मागणी केली.
  • सन 1938 – पं. जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताची घटना ही प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे तयार करावी, अशी मागणी केली
  • सन 1940 – ‘लॉर्ड लिनलिथगो’ यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे, ब्रिटिश सरकारने हे मान्य केले की, भारताची घटना ही मुख्यत्वे भारतीयांनीच तयार करावी.
  • सन 1942 – सर स्टॅफर्ड क्रिप्स मिशनद्वारे भारताची घटना ही पूर्णत: भारतीयांनी तयार करावी, हे मान्य करण्यात आले.
  • सन 1946 – कॅबिनेट मिशन प्लॅनदवारे संविधान सभेची तरतूद करण्यात आली.

*थोडक्यात महत्त्वाचे :-

कॅबिनेट मिशन :-

(त्रिसदस्यीय) त्रिमंत्री योजना :-

  1. लॉर्ड पेथिक लॉरेन्स
  2. सर स्टॅफोर्ड क्रिप्स
  3. ए. व्ही. अलेक्झांडर

*महत्त्वाचे :-

24 मार्च 1946 ला भारतात येऊन 16 मे 1946 ला त्यांनी त्यांची योजना प्रसिध्द केली.

Read also : भारतीय संविधान किंवा राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया

*घटना समितीची रचना / संविधान सभेची रचना / Structure of Indian Constitution Committee*

*कॅबिनेट मिशनद्वारे संविधान सभेची रचना :-

  • संविधान सभेत एकूण 389 सदस्य
  • त्यापैकी ब्रिटिश प्रांत = 292
  • भारतीय संस्थानिक = 93
  • चिफ कमिशनर = ४

1) दिल्ली 2) अजमेर मारवाड 3) कुर्ग 4) बलुचिस्तान

फाळणीनंतर सदस्य संख्या 299 झाली. पैकी प्रांत = 229 व संस्थानिक 70

* संविधान सभेच्या सदस्यांच्या निवडणूका:-

  1. सदस्यांच्या निवडणूका एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या पद्धतीने होतील असे ठरले.
  2. 1935 च्या कायद्याने स्थापन झालेल्या प्रांतिक कायदेमंडळ सदस्यांकडून निवडून दिले जातील.
  3. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण ठरले. सर्वांनाच संधी मिळावी, यासाठी शीख, मुस्लिम, साधारण अशी विभागणी केली.
  4. जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये ब्रिटिशांना देण्यात आलेल्या 296(292+4) जागांसाठी निवडणूका घेण्यात आल्या.
  5. 15 जागा महिलांना मिळाल्या.
Who wrote the Constitution of India
  1. अम्मू स्वामीनाथन
  2. सरोजिनी नायडू
  3. दक्षिणानी वेलायुद्ध
  4. बेगम एजाज रसूल
  5. दुर्गाबाई देशमुख
  6. हंसा जीवराज मेहता
  7. लीला रॉय
  8. कमला चौधरी
  9. मालती चौधरी
  10. राजकुमारी अमृत कौर
  11. रेणूका रे
  12. विजयालक्ष्मी पंडित
  13. पूर्णिमा बॅनर्जी
  14. एॅनि मस्करिन
  15. सुचेता कृपलानी

म. गांधी व मुहम्मद अली जीना सोडून भारतातील सर्व महत्त्वाच्या व्यक्ती संविधान सभेच्या सदस्य होत्या.

Read also : महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती

*महत्त्वपूर्ण माहिती :- (संविधान सभेचे कामकाज)

  • संविधान सभेला पूर्णपणे सार्वभौम बनविले. त्यामुळे तिला तिच्या इच्छेने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार मिळाला. त्याबरोबरच ब्रिटिश संसदेने केलेले कायदे बदलण्याचा किंवा तो काढून टाकण्याचा अधिकार भारतीयांना मिळाला.
  • संविधान सभेला दोन महत्त्वाची कार्ये करावी लागली.
  1. घटना निर्मिती (अध्यक्ष:- डॉ. राजेंद्रप्रसाद)
  2. कायदे करणे (अध्यक्ष :- जी.व्ही मावळणकर) – निवड 17 नोव्हेंबर 1947
Constitution of India
  • संविधान सभेची दोन्ही कामे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत सुरू होती.
  • 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून काम केले.
  • संविधान सभेच्या कायदे करण्याच्या कार्यामुळे संविधान सभा ‘स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंडळ’ झाली.
FAQ
  1. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
  2. घटना समितीचे कामकाज किती दिवस चालले?
  3. घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली ?
  4. घटना समितीच्या एकूण किती उपसमिती होत्या?
  5. घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती *