Sources of Our Indian Constitution भारताच्या राज्यघटनेचे स्त्रोत, #1 भारतीय घटना कशी तयार झाली?

भारतीय घटनेचे मुख्य स्त्रोत

Sources of Our Indian Constitution म्हणजेच भारतीय घटनेचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत? हे आज आपण या लेखात पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील तरतुदी साठ देशांच्या घटनेचा अभ्यास करून व भारत सरकार कायदा 1935 मधून घेण्यात आले आहेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते; जगातील ज्ञात असलेल्या सर्व राज्यघटना धुंडाळून भारतीय राज्यघटना बनवण्यात आली आहे.

Sources of Our Indian Constitution

📌 भारतीय घटनेचा राजकीय भाग-

यांत संसदीय शासनव्यवस्था असून हा भाग ब्रिटनच्या घटनेवर आधारित आहे.

📌भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक भाग

यांतील तरतुदी 1935 चा भारत सरकार कायदा यांतील आहेत. एकूण 250 तरतूदी या कायद्यातील आहेत.

Sources of Our Indian Constitution

Read also :- मसुदा समितीची माहिती (Drafting Committee)

📌भारतीय राज्यघटनेचा तात्विक भाग

यांतील मुलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे ही अमेरिकन व आयरिश घटनेवर आधारित आहेत. बरेच जण म्हणतात की, भारतीय राज्यघटना ही उसनी घटना, ठिगळांचे कार्य आहे. पण आपल्या घटनेने इतर घटनेतील चुका टाळून नाविन्यपूर्ण घटना तयार केली आहे. भारतीय घटना ही सुंदर ठिगळांचे कार्य आहे, असे म्हणण्यात आले. खाली दिलेल्या विविध देशांच्या घटनेचा अभ्यास करून योग्य त्याच तरतुदी आपल्या संविधानात घेण्यात आल्या आहेत.

✒️1935 च्या भारतीय शासन कायद्याकडून

 • संघराज्य योजना
 • प्रशासकीय तपशील
 • न्यायव्यवस्था
 • लोकसेवा आयोग
 • आणीबाणीच्या तरतुदी

Read also :- भारतीय घटना कशी तयार झाली ?

✒️ब्रिटिशच्या घटनेकडून

 • संसदीय शासनव्यवस्था
 • द्विगृही संसद
 • संसदेचे विशेष अधिकार
 • कायदे करण्याची पद्धत
 • कायद्याचे राज्य
 • एकेरी नागरिकत्व

✒️USA (अमेरिका) च्या घटनेकडून

 • मुलभूत हक्क
 • उपराष्ट्रपती पद
 • न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य
 • न्यायिक पुनर्विलोकन
 • सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांना पदावरुन दूर करण्याची पद्धत (महाभियोग पद्धत)

✒️कॅनडाच्या घटनेकडून

 • प्रभावी केंद्र असलेली संघराज्य पद्धत
 • शेषाधिकार केंद्राकडे असलेली तरतूद
 • राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक
 • सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र

✒️आयरिशच्या घटनेकडून

 • राज्यधोरणातील मार्गदर्शक तत्त्वे
 • राष्ट्रपतींच्या निवडणूकीची पद्धत
 • राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन

✒️ ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून

 • समवर्ती सूची
 • संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक
 • व्यापार व वाणिज्य यांचे स्वातंत्र्य

✒️फ्रान्सच्या घटनेकडून

 • गणराज्य म्हणजे लोकांचे राज्य
 • प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे राज्य

✒️दक्षिण आफ्रिकेच्या घटनेकडून

 • घटना दुरुस्ती पद्धत
 • राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक

✒️सोव्हिएत रशियाच्या घटनेकडून

 • मुलभूत कर्तव्ये
 • प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा आदर्श

✒️जपानच्या घटनेकडून

 • कायदा आणि प्रस्थापित पद्धत

✒️जर्मनीची घटना

 • आणीबाणी दरम्यान मुलभूत हक्क स्थगित होणे.

थोडक्यात महत्त्वाचे

 • USA घटनेकडून- मुलभूत हक्क
 • सोव्हिएत रशिया घटनेकडून- मुलभूत कर्तव्ये