Useful Proceedings of the Constituent Assembly | #2 संविधान सभेचे मुख्य कार्य काय होते?

संविधान सभेचे कामकाज | घटना समितीचे कामकाज

Proceedings of the Constituent Assembly म्हणजेच संविधान सभेचे मुख्य कार्य काय होते? हे आपण या लेखात पाहणार आहोत.

Proceedings of the Constituent Assembly

📌9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक होवून फ्रान्सचे अनुकरण करून ज्येष्ठतम सदस्य असणाऱ्या ‘डॉ. सच्चिदानंद सिन्हा’ यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले.

📌11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.

  • अध्यक्ष :- डॉ. राजेंद्रप्रसाद
  • उपाध्यक्ष :- एच्. सी. गुखर्जी
  • घटनात्मक सल्लागार :- सर बी. एन्. राव

📌15 डिसेंबर 1946 पं. नेहरूंनी घटनात्मक संरचनेची मूलतत्वे व तत्वज्ञान असणारी उद्देशपत्रिका संविधान सभेत मांडली. यालाच उद्दिष्टांचा ठराव / ऐतिहासिक ठराव म्हणतात.

Read also :- Sources of Our Indian Constitution भारताच्या राज्यघटनेचे स्त्रोत

📌22 जानेवारी 1947 संविधान सभेने उद्देशपत्रिकेचा स्वीकार केला. उद्देशपत्रिका घटनानिर्मितीची मार्गदर्शक बनली. संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा उद्देशपत्रिकेवरूनच तयार केला.

📌मे 1949 ला संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्याला मान्यता दिली.

📌22 जुलै 1947 ला सभेने आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. याचे डिझाइन आंध्र प्रदेशातील पिंगली वेंकय्या यांनी तयार केले.

📌24 जानेवारी १९५० रोजी सभेने राष्ट्रगीत व राष्ट्रगानला स्वीकृत केले. (भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ ला सर्वप्रथम राष्ट्रगीत गायले गेले.

📌२४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेची शेवटची बैठक घेण्यात आली. या बैठकीत असे ठरले की, २६ जानेवारीपासून ते लोकसभेच्या निवडणूका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित केले.

📌भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड करण्यात आली.

संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे.

Proceedings of the Constituent Assembly

संविधान सभेच्या समित्या/ घटना समितीच्या समित्या

घटना बनविताना विविध कामे पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी संविधान सभेने मुख्य 8 इतर काही दुय्यम समित्या स्थापन केल्या.

घटना समितीच्या समित्याअध्यक्ष
1) संघराज्य अधिकार समितीपं. जवाहरलाल नेहरू
२) संघराज्य घटना समितीपं. जवाहरलाल नेहरू
3) राज्यांशी चर्चेसाठी समिती/ संस्थाने समितीपं. जवाहरलाल नेहरू
4) प्रांतिक राज्यघटना समितीसरदार वल्लभाई पटेल
5) मुलभूत हक्क व अल्पसंख्यांक विषयक
सल्लागार समिती
सरदार वल्लभाई पटेल
6) मसुदा समितीडॉ. बाबासाहेब आंबेडकर
7) कार्यपद्धती नियम समितीडॉ राजेंद्र प्रसाद
8) सुकाणू समितीडॉ. के. एन्. मुन्शी
Useful Proceedings of the Constituent Assembly

मसुदा समिती या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

Read also :- संविधान सभेचे कामकाज

मूलभूत अधिकार व अल्पसंख्यांक विषयक सल्लागार समितीच्या उपसमित्या :- अध्यक्षः- सरदार पटेल
  1. मुलभूत हक्क उपसमिती- जे. बी. कृपलानी
  2. अल्पसंख्याक उपसमिती – एच. सी. मुखर्जी
  3. ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र (आसामची अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत न केलेली क्षेत्रे उपसमिती) :-गोपीनाथ बार्डोलोई
  4. आसाम सोडून अंतर्भूत न केलेली व अंशत: अंतर्भूत न केलेली क्षेत्रे उपसमिती- ए. व्ही. ठक्कर

संविधान सभेच्या दुय्यम / गौण समित्या :-

समित्याप्रमुख
1) वित्त व कर्मचारी समितीडॉ. राजेंद्रप्रसाद
2) अधिकारपत्रे समितीअल्लादी कृष्णस्वामी अय्यर
3) गृह समितीबी. पट्टाभी सीतारामय्या
4) कामकाज क्रम समितीडॉ. के. एन्. मुन्शी
5) राष्ट्रध्वज हंगामी समितीडॉ. राजेंद्र प्रसाद
6) घटना समितीच्या कार्याविषयी समितीग.वा. मावळणकर
7) सर्वोच्च न्यायालयासंबंधी हंगामी समितीएस. वरदाचारी (हे घटना समितीचे सदस्य नव्हते)
8) प्रांत मुख आयुक्त समितीबी. पट्टाभी सीतारामय्या
9) राज्यघटनेतील आर्थिक तरतुदी तज्ञ समितीनलिनी रंजन सरकार (या घटना समितीच्या सदस्य नव्हत्या)
10) भाषावार प्रांतसंबंधी समितीएस. के. दार (घटना समितीचे सदस्य नव्हते.)
11) मसुदा परिक्षण समितीपं. जवाहरलाल नेहरू
12) वृत्तपत्र कक्ष समितीउषानाथ सेन
13) नागरिकत्वावरील एतदर्थ समितीएस. वरदाचारी
Useful Proceedings of the Constituent Assembly

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लेखी स्वरुपात असणारे संविधान आहे.

भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

डॉ. राजेंद्र प्रसाद

सर्वप्रथम राष्ट्रगीत कधी गायले गेले?

२७ डिसेंबर १९११ ला