RBI ने 2000 रूपयांची नोट बंद केली
Table of Contents
RBI to withdraw 2000 notes completely
8 नोव्हेंबर 2016 ला भारत सरकारकडून 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करणात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा RBI ने देशात 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
8 नोव्हेंबर 2016 पासून ५०० व 1000 रुपयांच्या नोटा मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद केल्या. ५०० व 1000 रूपयांच्या नोटा बंद केल्यावर चलनातील मागणी पूर्ण व्हावी, यासाठी RBI ने रिझर्व बँक ऑफ इंडिया-१९३४ अनुच्छेद २४(1) नुसार 2000 रूपयांची गुलाबी नोट 2016 मध्ये चलनात आणली होती.
📌2000 रूपयांच्या नोटेबाबत थोडक्यात
2000 रुपयांची नोट नोव्हेंबर 2०१६ मध्ये RBI ने चलनात आणली. नोटेच्या पुढील भागावर महात्मा गांधीजींचे चित्र व अशोक स्तंभ आहे व मागील भागावर मंगलयान आहे. “एक कदम स्वच्छता की ओर” हे घोषवाक्य स्वच्छ भारत अभियानाचे प्रतिनिधीत्व करते. या नोटेवर नोटेचे मूल्य १७ भारतीय भाषांत लिहले आहे. RBI चे गव्हर्नर यांची स्वाक्षरी यावर आहे.
Read also : भारतीय संविधान किंवा राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया
📌2000 रूपयांच्या नोटेची सुरुवात
RBI ने रिझर्व बँक ऑफ इंडिया-१९३४ अनुच्छेद २४(1) नुसार 2000रु. ची नोट गुलाबी नोट नोव्हेंबर २०१६ पासून चलनात आणली.
RBI to withdraw 2000 notes completely
📌२००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद
१०, २०, ५०, १००, ५०0 या नोटांच्या नवीन चलनानंतर 2000 रूपयांच्या नोटेचा उद्देश पूर्ण झाला असल्याने RBI ने 2000 रुपयांच्या नोटेची छपाई २०१8 ते 2019 मध्येच बंद केली होती. मार्च २०१७ मध्ये RBI ने सांगितले होते की, या नोटांचा वापर चार वर्षांपुरताच मर्यादित असेल.
📌क्लीन नोट पॉलिसी
क्लीन नोट पॉलिसीनुसार लोकांना चांगल्या दर्जाच्या नोटा पुरविणे. RBI ने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत 19 मे 2023 रोजी 2000 रूपयांच्या नोटा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
📌नोट बदलण्याची सुविधा
2000 रूपयांची नोट कधीपासून बदलवता येणार या संदर्भात RBI ने सांगितल्याप्रमाणे मंगळवार २३ मे 2023 पासून आपण आपली नोट बँकेत जमा करून त्या बदल्यात तेवढे पैसे बँकेकडून घेवू शकतो. बँकेचे कामकाज व्यवस्थित चालावे, यासाठी एका वेळी 20 हजार रुपये जमा करता येवू शकतात. ३० सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट जमा करता येईल. नोट बदलून घेण्यासाठी RBI ने चार महिने मुदत दिली आहे. दिलेल्या नोटांच्या बदल्यात आपण तेवढी रक्कम बँकेकडून घेवू शकतो किंवा तेवढीच रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करू शकतो.
📌रकमेची मर्यादा
KYC (KYC = Know your customer) नियमानुसार कोणत्याही मर्यादेशिवाय आपण पैसे बँकेत जमा करू शकतो, पण KYC नसेल तर RBI च्या नियमानुसार पैसे जमा करावे लागतात. सध्या तर एका व्यक्तीला एकाच वेळी 20 हजार रुपये इतर नोटांच्या स्वरूपात घेता येतील. नोटा बदलण्यासाठी कोणतीही फी असणार नाही. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलता येतील.
📌बँकेची भूमिका आणि आपण
2000 रू. ची नोट बदलण्यासाठी आलेल्या अपंग, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होवू नये, याची काळजी बँकांनी घ्यावी असे RBI ने म्हटले आहे. बँकेने नोट बदलण्यास नकार दिला तर आपण बँकेच्या तक्रार विभागात तक्रार विभागात तयार नोंदवू शकतो. तक्रार नोंदवून ३० दिवसांच्या आत बँकेने काहीच उपाय केला नाही तर RBI-IOS (Integrated Ombudsman Scheme – 2021 नुसार आपण रिझर्व बँकेच्या cms.rbi.org.in या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो.
तुमच्या बँक खात्यात पैसे भरण्यासाठी तुम्हाला जो सोपा मार्ग वाटतो तो तुम्ही वापरू शकता. व्यवसायासाठी तुमच्या बँक खात्यात ही रक्कम भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या मर्यादा नाहीत. 2000 रुपयांच्या नोटा बँकेत भरून आपल्याला हव्या त्या पद्धतीने त्या नोटा बँकेतून काढता येऊ शकतात.
👉🏻सर्वांत महत्त्वाचे
- 23 मे 2023 पासून 2000 च्या नोटा जमा करून घेतल्या जातील.
- ३० सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रूपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात.
- 2000 रूपयाच्या नोटांच्या बदल्यात तेवढीच रक्कम घेता येईल.
- सध्या व्यवहारातील नोटा अजूनही वैध आहेत, त्यांची आपण देवाण घेवाण करू शकतो.
- ३० सप्टेंबर पर्यंत या नोटा आपण वापरू शकतो.