Delicious Crispy Puree #3 स्वादिष्ट तिखट कुरकुरीत पुऱ्या

चविष्ट, मस्त पदार्थ, तिखट कुरकुरीत पुऱ्या

Delicious Crispy Puree
सुट्टी लागली की प्रत्येकाला वेध लागतात ते कुठंतरी मस्तपैकी ट्रिपला जायचे.. ट्रिपला जाणं म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय. पण ट्रिप जर लांबच्या प्रवासाची, 2 ते 4 दिवस मुक्काम करणारी असेल तर खूप मज्जा येते. पण त्याचवेळी घरातल्या प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की, एवढे दिवस ट्रिप तर आहे, त्यामुळे आपल्या मुलांना, माणसांना वेळच्या वेळी काही तरी खायला मिळाले पाहिजे… यासाठी तिच्या मनात खूप प्रश्न उभे राहतात.. कमी वेळेत, कमी पैशात आणि चार दिवस टिकेल असा पदार्थ करण्यासाठी ती धडपड करते. अशी अवस्था प्रत्येक गृहिणीची ट्रिपला जाण्यासाठी नक्कीच होत असते. त्यासाठी मी आज एक सोपी पाककृती तुम्हांला सांगणार आहे…

Deliciously Crispy Puree

Delicious Crispy Puree

चविष्ट, स्वादिष्ट आणि घरची चव असणाऱ्या तिखट कुरकुरीत पुऱ्या…

📌 साहित्य

आपल्या पाककृतीसाठी साहित्य खालील प्रमाणे घेऊ-

 • गव्हाचे पीठ चार वाट्या
 • मैदा दोन वाट्या
 • रवा किंवा गरा 1 वाटी (बारीक रवा)
 • लाल तिखट चार चमचे, मीठ (चवीनुसार)
  (तिखट घेताना 2 चमचे लाल व 2 चमचे मसाला
  तिखट किंवा चटणी वापरणे.)
 • कसुरी मेथी 2 चमचे
 • धने, जिरे पूड प्रत्येकी 2 चमचे
 • 1 चमचा ओवा
 • मोहन म्हणजे गरम तेल अर्धी वाटी.

Read also :- गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या | आकाड तळणे स्पेशल

📌 पाककृती


Delicious Crispy Puree बनवण्यासाठी आपण पुऱ्या करायला घेऊया.

सर्वांत आधी एका परातीमध्ये म्हणजे एक मोठ्या ताटात गव्हाचे पीठ, मैदा, रवा चाळणीने चाळून घेणे. यामध्ये धने, जिरे पूड, कसुरी मेथी, ओवा, मीठ, तिखट टाकून चांगले मिसळून घेणे. यानंतर यात गरम तेल टाकून आधी उलतण्याने ते तेल मिसळून घेणे, नंतर हाताने ते पीठ चांगले चोळून घेणे, म्हणजे तेलामुळे तिखट मीठ चांगले पिठात मिसळते आणि पदार्थाला चव येते; मोहन घातल्याने पदार्थ कुरकुरीत होतो. यानंतर पीठ चांगले मऊसूद मळून घेणे. ते पीठ अर्धा तास तसेच झाकून ठेवणे.
यानंतर एक गोळा घेऊन चपातीसारखे पातळ लाटून घेणे व त्यावर छोट्या वाटीने गोल आकार काढून पुऱ्या पेपरवर काढून ठेवणे, असे चार पाच गोळ्यांच्या पुऱ्या करून घेणे. कढईत तेल गरम झाले की मध्यम आचेवर पुऱ्या तळून घेणे. पुऱ्या थंड झाल्या की एका डब्यात झाकून ठेवणे.

Read also :- तिखट मिठाच्या पुऱ्या

प्रवासात या पुऱ्या तीन ते चार दिवस खाण्यायोग्य व चविष्ट राहतात. सर्वांनी लगेच तयार होणारा व जास्त दिवस टाकणारा तोंडाला चव आणणारा पदार्थ नक्की बनवून बघा….
प्रवासाला जाताना तर हा पदार्थ नक्कीच घेऊन जाता येतो, त्याचबरोबर आपली मुले काहीतरी खाऊ मागतात, मग त्यांच्यासाठी सुद्धा हा पदार्थ बनवून ठेवू शकता..