Vivo X90 Pro 1 इंच कॅमेरा सेन्सर आणि 12GB RAM सह सादर करण्यात आला आहे. सर्वात प्रिमीयम असणाऱ्या X सिरीजमध्ये Vivo X90 Pro  स्मार्टफोन 26 एप्रिल 2023 रोजी भारतात सादर करण्यात आला आहे. विवोने काही दिवसांपूर्वी चीन व मलेशिया मध्ये लाँच केला होता. या Vivo X90 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये मध्ये 1-इंचाचा Sony IMX989 सेन्सरसह Zeiss ऑप्टिक्स देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटो क्वालिटी उत्कृष्ट असणार आहे. DSLR कॅमेरासारखे फोटो यामध्ये येऊ शकतात. हा फोन खास कॅमेराची आवड असणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. या फोनमध्ये IP68 रेटिंग देण्यात आलेली आहे तसेच स्टेरीओ स्पीकर देण्यात आले आहेत.

प्रोसेसर

या स्मार्टफोन सोबतच विवोने Vivo X90 हा स्मार्टफोन देखील लाँच करण्यात आला आहे. या दोन्ही फोन्समध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9200 SoC हा 4 नॅनोमीटर टेक्नोलॉजीवर आधारित असणारा फ्लॅगशीप प्रोसेसर देण्यात आलेला असून तो 3.05 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. सोबतच यामध्ये विवोची V2 चीप सुद्धा बसवण्यात आलेली आहे ज्यामुळे फोटो प्रोसेसिंग खूपच चांगले होते.

डिस्प्ले

 • पंच होल कटआऊट,
 • 20:9 अस्पेक्ट रेशियो,
 • 452 PPI,
 • 2160Hz PWM,
 • HDR10+,
 • 300Hz टच सॅम्पलिंग रेट व 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह Full HD+ 6.79 इंच अ‍ॅमोलेड डिस्प्ले
 • स्क्रीनचे रिझोल्यूशन 1260×2800 आहे असून 2K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.

कॅमेरा

 • दोन्ही मोबाईल 32MP च्या सेल्फी कॅमेरासह येतात.
 • एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्स
 • एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स
 • T* कोटिंग मुळे लाईटची / सूर्याची किरणे रोखली जाऊ शकतात.
 • पाण्यात सुद्धा फोटो काढता येतात.
 • Astro Photography तसेच Milky way चे फोटो काढू शकता.
 • खूप अंधार असला तरी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

बॅटरी

 • Vivo X90 मध्ये 4,810 एमएएचची बॅटरी
 • Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870 एमएएच बॅटरी
 • दोन्ही मोबाइल फोन्स 120 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
 • X90 Pro 50 वॉट वायरलेस चार्जिंगसुद्धा देण्यात आले आहे.

दोन्ही फोन अँड्रॉइड 13 वर बनवण्यात आलेल्या फनटच ओएस वर चालतात. विवोच्या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage देण्यात आलेली आहे. X90 मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसुद्धा उपलब्ध आहे.

          या फोनच्या पाठीमागच्या बाजूला लेदर वापरले असून याची फ्रेम सर्जिकल ग्रेड स्टेनलेस स्टील आहे. फोन थंड राहण्यासाठी लिक्विड कुलिंग वेपर चेंबूरचा देखील वापर करण्यात आला आहे.

किंमत

 • Vivo X90 Pro चा एकमेव व्हेरिएंट 12GB + 256GB सह येतो, ज्याची किंमत 84,999 रुपये आहे.
 • Vivo X90 च्या सुरुवातीच्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे.
 • Vivo X90 चा 12GB + 256GB मॉडेल 63,999 रु. आहे.

विवोचे दोन्ही फोन 5 मे 2023 पासून बाजारात मिळतील.