*संविधान सभा (पार्श्वभूमी) :-
1946 च्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या मदतीने ‘संविधान सभा’ स्थापना करण्यात आली. भारतासाठी योग्य संविधान तयार करण्याचे काम संविधान सभेने केले.
*संविधान सभा :-
“लोकशाही देशाच्या राज्यघटनेवर चर्चा करून ती मान्य करण्याच्या हेतूने लोकांनी निवडून दिलेल्या सभेला ‘संविधान सभा’ म्हणतात.”
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली होती.
*संविधान सभेची मागणी :-
भारतासाठी संविधान सभा/ घटना परिषद ही कल्पना मांडण्याचे श्रेय भारताचे साम्यवादी चळवळीचे प्रणेते, पुरोगामी लोकशाहीवादाचे समर्थक डॉ. मानवेंद्रनाथ रॉय यांना जाते.
*संविधान सभेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण विचार/ चर्चा/ निर्णय
- सन 1922 – महात्मा गांधीनी सर्वांत प्रथम संविधान सभा असा शब्द न वापरता अशा सभेची मागणी केली.
- सन 1934 – सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची मागणी केली.
- सन 1934 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पाटणा येथील बैठकीत घटनात्मक सुधारणांचा अहवाल नाकारून संविधान सभेची मागणी केली.
- सन 1938 – पं. जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताची घटना ही प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे तयार करावी, अशी मागणी केली
- सन 1940 – ‘लॉर्ड लिनलिथगो’ यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे, ब्रिटिश सरकारने हे मान्य केले की, भारताची घटना ही मुख्यत्वे भारतीयांनीच तयार करावी.
- सन 1942 – सर स्टॅफर्ड क्रिप्स मिशनद्वारे भारताची घटना ही पूर्णत: भारतीयांनी तयार करावी, हे मान्य करण्यात आले.
- सन 1946 – कॅबिनेट मिशन प्लॅनदवारे संविधान सभेची तरतूद करण्यात आली.
*थोडक्यात महत्त्वाचे :-
कॅबिनेट मिशन :-
(त्रिसदस्यीय) त्रिमंत्री योजना :-
- लॉर्ड पेथिक लॉरेन्स
- सर स्टॅफोर्ड क्रिप्स
- ए. व्ही. अलेक्झांडर
*महत्त्वाचे :-
24 मार्च 1946 ला भारतात येऊन 16 मे 1946 ला त्यांनी त्यांची योजना प्रसिध्द केली.
Read also : भारतीय संविधान किंवा राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया
*घटना समितीची रचना / संविधान सभेची रचना / Structure of Indian Constitution Committee*
*कॅबिनेट मिशनद्वारे संविधान सभेची रचना :-
- संविधान सभेत एकूण 389 सदस्य
- त्यापैकी ब्रिटिश प्रांत = 292
- भारतीय संस्थानिक = 93
- चिफ कमिशनर = ४
1) दिल्ली 2) अजमेर मारवाड 3) कुर्ग 4) बलुचिस्तान
फाळणीनंतर सदस्य संख्या 299 झाली. पैकी प्रांत = 229 व संस्थानिक 70
* संविधान सभेच्या सदस्यांच्या निवडणूका:-
- सदस्यांच्या निवडणूका एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या पद्धतीने होतील असे ठरले.
- 1935 च्या कायद्याने स्थापन झालेल्या प्रांतिक कायदेमंडळ सदस्यांकडून निवडून दिले जातील.
- 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण ठरले. सर्वांनाच संधी मिळावी, यासाठी शीख, मुस्लिम, साधारण अशी विभागणी केली.
- जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये ब्रिटिशांना देण्यात आलेल्या 296(292+4) जागांसाठी निवडणूका घेण्यात आल्या.
- 15 जागा महिलांना मिळाल्या.
- अम्मू स्वामीनाथन
- सरोजिनी नायडू
- दक्षिणानी वेलायुद्ध
- बेगम एजाज रसूल
- दुर्गाबाई देशमुख
- हंसा जीवराज मेहता
- लीला रॉय
- कमला चौधरी
- मालती चौधरी
- राजकुमारी अमृत कौर
- रेणूका रे
- विजयालक्ष्मी पंडित
- पूर्णिमा बॅनर्जी
- एॅनि मस्करिन
- सुचेता कृपलानी
म. गांधी व मुहम्मद अली जीना सोडून भारतातील सर्व महत्त्वाच्या व्यक्ती संविधान सभेच्या सदस्य होत्या.
Read also : महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती
*महत्त्वपूर्ण माहिती :- (संविधान सभेचे कामकाज)
- संविधान सभेला पूर्णपणे सार्वभौम बनविले. त्यामुळे तिला तिच्या इच्छेने कोणत्याही प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार मिळाला. त्याबरोबरच ब्रिटिश संसदेने केलेले कायदे बदलण्याचा किंवा तो काढून टाकण्याचा अधिकार भारतीयांना मिळाला.
- संविधान सभेला दोन महत्त्वाची कार्ये करावी लागली.
- घटना निर्मिती (अध्यक्ष:- डॉ. राजेंद्रप्रसाद)
- कायदे करणे (अध्यक्ष :- जी.व्ही मावळणकर) – निवड 17 नोव्हेंबर 1947
- संविधान सभेची दोन्ही कामे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत सुरू होती.
- 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून काम केले.
- संविधान सभेच्या कायदे करण्याच्या कार्यामुळे संविधान सभा ‘स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंडळ’ झाली.
FAQ
- घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
- घटना समितीचे कामकाज किती दिवस चालले?
- घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली ?
- घटना समितीच्या एकूण किती उपसमिती होत्या?
- घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती *