असं घडतं बालपण…. माझे बालपण मराठी निबंध..

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बालपण महत्वाचे का आहे?

“असं घडतं बालपण” यावर मी लेख लिहिला आहे. आवडला तर सर्वांनी शेअर करा त्या सर्वाना ज्यांना आपले बालपण महत्त्वाचे वाटते.

असं घडतं बालपण….

नमस्कार सर्वांना🙏
खरचं बालपण किती आनंददायी असतं ना, ना कोणती चिंता, ना कोणतं पैश्याच टेंशन, लोक काय म्हणतील याचा विचारसुद्धा मनात येत नाही. सकाळी बिनधास्त उठायचं, आई काळजीपूर्वक आपलं सगळं करत असते, घरातील सगळे जण आपल्याला प्रेमाने वागवतात.
ज्याचा बालपणाचा पाया संस्काराने आणि घरभरल्या माणसांनी समृद्ध झालाय ना तो जीवनात कधीच कोणत्याच संकटात हरणार नाही. संस्काराने तो जगातील माणसांना आपलं करून घेतो आणि माणसांच्या सहवासाने तो कोणत्याही क्षेत्रात गेला तरी तो तिथे तडजोड करून माणसांना समजून घेऊन आपली यशाची उंच भरारी घेतोच.
ज्याला बालपणी आजीआजोबांचे प्रेम, माया, संस्कार मिळतात ना ती व्यक्ती खूप खूप भाग्यवान असते. आपली नातवंडे म्हणजे आजीआजोबांचे जीव की प्राण असतात, आजीआजोबांना औषधे कमी पण ना नातवंडेच जास्त लागतात आणि नातवंडांना खेळणी कमी पण आजीआजोबाच जास्त लागतात. आजीआजोबांसोबत खेळणे, शाळेतील सगळ्या गमतीजमती सांगणे, एकत्र ताटात जेवणे, आईवडिलांपेक्षा जास्त हट्ट त्यांच्याकडे करणे, आनंदाने आजीआजोबांच्या कुशीत झोपणे. खरचं किती सुखदायक क्षण असतात ते… आजीआजोबा आपले पहिले आणि खास मित्र मैत्रिण असतात, आईवडील आपल्याला रागविले तर आपल्याला प्रेमाने समजावून सांगून उलट आपल्या आईवडिलांनाच रागवितात. आपल्या जीवनातील खूप मौल्यवान ठेवा आपल्याला आपले आजीआजोबा देतात.

Read also :- माझी यशस्वितेची परिभाषा

आपला भविष्यकाळही आपल्या बालपणीच खूप सुंदर बनवितात, स्वतःच्या आधी ते आपला विचार करतात, प्रत्येक क्षण आपल्यासाठी आनंदी बनवितात, त्यांचं सगळं जगणंच आपल्यासाठी असतं, आपलं फक्त हसणं हेसुद्धा त्यांच्यासाठी खूप ताकदवान असतं, त्या महान व्यक्ती म्हणजे आपले आईवडील… बालपणाला योग्य वळण, आकार, दिशा देण्याचे काम फक्त आईवडीलच करू शकतात…

माझे बालपण मराठी निबंध असं घडतं बालपण


माया करणारी, आपल्याला फिरायला नेणारी, पाहिजे ते घेऊन देणारी, आपला अभ्यास घेणारी, आपल्याला छान छान गोष्टी सांगून चिऊ काऊचा घास भरविणारी आत्या.. आत्या आणि आपलं नातं खूपचं मस्त असतं ना…
आईप्रमाणे आपल्याला जीव लावणारी, आपले सगळे हट्ट पुरविणारी, नवनवीन वस्तू घेऊन देणारी आपली माऊ… आपली मावशी आपलं बालपण सुखद बनविते.
आईवडिलांप्रमाणे आपल्याला सांभाळणारे, बाहेरून येताना आपल्या आवडीचा खाऊ घेऊन येणारे, आईचं ओरडणं खाण्यापासून वाचविणारे आपले काका-काकी आपलं बालपण अजून रंगीन बनवितात….

Read also :- माझे बालपण मराठी निबंध

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बालपण त्यावेळी आनंदी होतं ज्यावेळी आपल्याला दिदी-दादा असतात. मस्तीत भागीदार, सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण, सगळं सारखंच पाहिजे म्हणून हट्ट, पण तेवढंच एकमेकांवर प्रेम… कितीही भांडण झालं तरी दिदी-दादासाठी खाऊ ठेवायचा, घरात नसले तर त्यांना शोधायचं, गावाला गेले तर त्यांच्या आठवणीने रडायचं हे सगळं फक्त आणि फक्त बालपणातच होतं..
बालपणी आपल्याला आपले शिक्षक खूप छान शिकवून आपलं बालपण अधिक समृद्ध करतात. गोष्टी, बडबडगीते, श्लोक, प्रार्थना यातून ते आपल्याला संस्काराची शिदोरी देतात. हाताला धरून लिहायला शिकवितात आणि आपल्या जीवनालासुद्धा योग्य आकार देतात…
आपलं बालपण सुंदर बनविण्यासाठी या सगळ्यांसोबतच आपला शेजार, आपले मित्र, निसर्ग खूप महत्त्वाची भूमिका बजावतात… आणि असं घडतं बालपण…

FAQ

  • एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बालपण महत्वाचे का आहे?
  • बालपण म्हणजे काय?