महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती | माझा महाराष्ट्र | महाराष्ट्र दिन
प्रणाम घ्यावा माझा हा
श्री महाराष्ट्र माझा
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या भारत देशातील पश्चिम भागातील एक विकसनशील राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. महाराष्ट्राला अनेक नेते, महान संत, अनेक अज्ञात व्यक्तींनी महान व पावन बनविले आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातीलच राजे होते. जगाला समता, बंधूता ही महान तत्वे देणाऱ्या महामानवाचा जन्म महाराष्ट्रामध्येच झाला. महाराष्टाने देशाला अनेक अधिकारी, खेळाडू, संशोधक, अभिनेते, साहित्यिक दिले. अशा पवित्र व पावन असणाऱ्या महाराष्ट्र राज्याची माहिती आपण जाणून घेऊया…
महाराष्ट्र नावाचा उगम–
याविषयी प्रत्येकाची मते वेगळी आहेत. ऋग्वेदात महाराष्ट्राला राष्ट्र म्हणत. ह्युएन-त्संग हा चिनी प्रवासी व इतर प्रवासी यांच्या वर्णनावरून असे दिसून येते की, सम्राट अशोक यांच्या काळात महाराष्ट्राला राष्ट्रिक या नावाने ओळखले जात असावे. महाराष्ट्र हे नाव प्राकृत भाषेतील महाराष्ट्री यावरून पडले असावे. काहींच्या मते, महाराष्ट्र हे नाव महाकांतार म्हणजेच महान वने दंडकारण्य असा अपभ्रंश आहे. अजूनही या राज्याच्या नावाचा गुंता सुटला नाही, पण या राज्याला महाराष्ट्र हे नाव शोभनीय व समर्पक आहे.
- स्थापना— 1 मे 1960 रोजी
- क्षेत्रफळ- 3,07,713 चौ.कि. मी(क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक)
- पूर्व पश्चिम लांबी- 800 कि. मी
- दक्षिण उत्तर रुंदी- 720 कि. मी
- लोकसंख्या- 11,23,72,972 (2011 च्या जनगणनेनुसार)
- नियामक मंडळ- महाराष्ट्र विधानमंडळ
- कार्यकारी मंडळ- महाराष्ट्र विधानसभा
- राजधानी- मुंबई
- उपराजधानी- नागपूर
- सांस्कृतिक राजधानी- पुणे
- शैक्षणिक राजधानी- पुणे
- ऐतिहासिक राजधानी-औरंगाबाद
- महाराष्ट्र सर्वोच्च बिंदू-कळसूबाई शिखर
- पहिले मुख्यमंत्री–यशवंतराव बळवंतराव चव्हाण
- सध्याचे मुख्यमंत्री–एकनाथ शिंदे (30 जून 2022 पासून)
- पहिले राज्यपाल-जॉन कॉलव्हील
- सध्याचे राज्यपाल-रमेश बैस (13 फेब्रुवारी 2023 पासून)
- राज्यगीत- जय जय महाराष्ट्र माझा (19 फेब्रुवारी 2023 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यगीताला मान्यता)
राज्यगीत कवी-राजा बढे
राज्यगीत संगीतकार-श्रीनिवास खळे
राज्यगीत गायक-कृष्णराव उर्फ शाहीर साबळे - एकूण जिल्हे-36
- एकूण तालुके-358
- एकूण महानगरपालिका-28 (28वी महानगरपालिका इचलकरंजी)
- महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग- 6 (कोकण,पुणे,नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर)
- महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग- 3 (कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत,महाराष्ट्र पठार)
- महाराष्ट्राची वने- उष्णकटिबंधीय
महाराष्ट्राची भाषा–
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात कोलामी, कोरकू, वारली, कातकरी गोंड, कातकरी, माडिया, पावरी या आदिवासी बोलीभाषा आहेत. भागानुसार कोकणी, कोल्हापुरी, अहिराणी, नागपुरी, मराठवाडी असे अनेक मराठी भाषेचे प्रकार आहेत.
महाराष्ट्रातील सण–
महाराष्ट्र राज्यात सांस्कृतिक विविधता असून पण एकता जपणारे राज्य आहे. इथे सर्व लोक गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, ईद, होळी, संक्रांत, बैलपोळा, नागपंचमी, रक्षाबंधन असे कितीतरी सण उत्साहाने साजरे करतात.
महाराष्ट्रातील संत–
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत रोहिदास, संत गोरोबा कुंभार, संत मुक्ताबाई, संत जनाबाई अशा कितीतरी संतांनी आपल्या वाणी आणि आचरणातून महाराष्ट्राला पावन बनविले. त्यांचे ग्रंथ, अभंग आजही आपल्याला प्रेरणादायी ठरतात.
महाराष्ट्रातील उद्योग–
महाराष्ट्रामध्ये शेती, साखर कारखाने, कापड गिरण्या, मसाले उद्योग, रसायने उद्योग, खाद्य उद्योग असे कितीतरी उद्योग आज महाराष्ट्र राज्यात केले जातात. हे उद्योग करण्यासाठी इतर राज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये येऊन आपला उदरनिर्वाह करतात.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे–
मन शांत आणि प्रसन्न करणारी, निसर्गाची किमया दाखवणारी नयनरम्य ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूर, कोकण, अंबोली, महाबळेश्वर, नाशिक, औरंगाबाद, लोणावळा, मुंबई अशी कितीतरी ठिकाणे महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रातील मंदिरे व किल्ले–
आपल्या शिवरायांची ओळख करून देऊन अंगावर काटे आणणारे किल्ले महाराष्ट्र राज्यात आहेत. रायगड, राजगड, शिवनेरी, सिंहगड, तोरणा, पन्हाळा, सिंधुदुर्ग, प्रतापगड असा ऐतिहासिक वारसा महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्रातील मंदिरे–
महाराष्ट्रात कोल्हापूर, खिद्रापूर, नाशिक याठिकाणी सुंदर नक्षीकाम केलेली प्राचीन मंदिरे आहेत. अष्टविनायक, पंढरपूर, तुळजापूर, नाशिक, कोल्हापूर, नरसोबाची वाडी(नृसिंहवाडी), अक्कलकोट, शिर्डी याठिकाणी असणारी मंदिरे प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रातील खेळ व लोककला–
या राज्यात कबड्डी, खोखो, क्रिकेट,पोहणे, इतर पारंपारिक खेळ खेळले जातात. कुस्ती हा या राज्यातील महत्वाचा खेळ आहे. लावणी, भारुडे, लेझीम, तमाशा, पोवाडा, कीर्तन, जागरण गोंधळ, वासुदेव अशा लोककलांचे दर्शन महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील दळणवळण–
महाराष्ट्रात रस्ते, लोहमार्ग, हवाई,जल वाहतूक केली जाते. राज्यात चार आंतराष्ट्रीय विमानतळ आणि दोन देशांतर्गत विमानतळ आहेत. मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ जगातील महत्वाच्या ठिकाणांना जोडले आहे.
इतर राज्यात जाण्यायेण्यासाठी रेल्वे वाहतूक स्वस्त आहे. गावोगावी जाण्यासाठी लालपरी सेवा देते.
महाराष्ट्रातील संग्रहालय–
न्यू पॅलेस, सिध्दगिरी, आगाखान पॅलेस, आदिवासी संग्रहालय, अरुंदमापी रेल्वे संग्रहालय, प्राणी संग्रहालय, कैकाडी मठ असे कितीतरी संग्रहालय महाराष्ट्रात आहेत. अशा कितीतरी व्यक्ती आणि गोष्टी महाराष्ट्र राज्यात आहेत पण त्या आपल्याला माहीत नाहीत, मात्र त्या महाराष्ट्र घडण्यात मदत करत आहेत. आपण त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे.
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा..
1 मे हा दिवस महाराष्ट्र निर्मिती साठी ज्या 106 व्यक्तींनी बलिदान दिले त्यांचे स्मरण यादिवशी केले जाते. यादिवशी सर्वांना सुट्टी असते, मात्र ध्वजारोहण करून विविध कार्यक्रम घेतले जातात. यादिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करतात. चांगला पगार, चांगली वागणूक, 8 तास काम, पगारी सुट्टी या मागण्यांसाठी 1 मे 1980 ला रक्तरंजित आंदोलने झाली,यांत कामगारांचा विजय झाला तेव्हापासून 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात लेबर किसान पार्टीने 1 मे 1923 रोजी पहिल्यांदा कामगार दिवस साजरा केला होता. यासाठी भारतात पहिल्यांदाच कामगार दिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल झेंडा वापरला होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील व्यक्ती खालीलप्रमाणे—
- यशवंत बाबाजी भगत
- गोविंद बाबूराव जोगल
- पांडूरंग धोंडू धाडवे
- गोपाळ चिमाजी कोरडे
- पांडूरंग बाबाजी जाधव
- बाबू हरी दाते
- अनुप माहावीर
- विनायक पांचाळ
- सिताराम गणपत म्हादे
- सुभाष भिवा बोरकर
- सिताराम बनाजी पवार
- जोसेफ डेव्हिड पेजारकर
- चिमणलाल डी. शेठ
- भास्कर नारायण कामतेकर
- रामचंद्र सेवाराम
- शंकर खोटे
- धर्माजी गंगाराम नागवेकर
- रामचंद्र लक्ष्मण जाधव
- के. जे. झेवियर
- पी. एस. जॉन
- भिकाजी बाबू बांबरकर
- सखाराम श्रीपत ढमाले
- नरेंद्र नारायण प्रधान
- शंकर गोपाल कुष्टे
- दत्ताराम कृष्णा सावंत
- बबन बापू भरगुडे
- विष्णू सखाराम बने
- सिताराम धोंडू राडये
- तुकाराम धोंडू शिंदे
- विठ्ठल गंगाराम मोरे
- रामा लखन विंदा
- एडवीन आमब्रोझ साळवी
- बाबा महादू सावंत
- वसंत द्वारकानाथ कन्याळकर
- विठ्ठल दौलत साळुंखे
- रामनाथ पांडूरंग अमृते
- परशुराम अंबाजी देसाई
- घनश्याम बाबू कोलार
- धोंडू रामकृष्ण सुतार
- मुनीमजी बलदेव पांडे
- रघुनाथ सखाराम बीनगुडे
- काशीनाथ गोविंद चिंदरकर
- करपैया किरमल देवेंद्र
- चुलाराम मुंबराज
- बालमोहन
- अनंता
- गंगाराम विष्णू गुरव
- रत्नु गोंदिवरे
- सय्यद कासम
- भिकाजी दाजी
- शरद जी. वाणी
- वेदीसिंग
- रामचंद्र भाटीया
- गंगाराम गुणाजी
- गजानन ऊर्फ बंडू गोखले
- निवृत्ती विठोबा मोरे
- आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
- बालप्पा मुतण्णा कामाठी
- धोंडू लक्ष्मण पारडूले
- भाऊ सखाराम कदम
- गणपत रामा तानकर
- सिताराम गयादीन
- गोरखनाथ रावजी जगताप
- महमद अली
- तुळशीराम पुंजाजी बेलसरे
- देवाजी सखाराम पाटील
- शामलाल जेठानंद
- सदाशिव महादेव भोसले
- भिकाजी पांडूरंग रंगाटे
- वासुदेव सुर्याजी मांजरेकर
- मुनशी वझीऱअली
- दौलतराम मथुरादास
- विठ्ठल नारायण चव्हाण
- देवजी शिवन राठोड
- रावजीभाई डोसाभाई पटेल
- होरमसजी करसेटजी
- गिरधर हेमचंद लोहार
- सत्तू खंडू वाईकर
- गणपत श्रीधर जोशी
- माधव राजाराम तुरे(बेलदार)
- मारुती बेन्नाळकर
- मधूकर बापू बांदेकर
- लक्ष्मण गोविंद गावडे
- महादेव बारीगडी
- कमलाबाई मोहिते
- सीताराम दुलाजी घाडीगावकर
- शंकरराव तोरस्कर
- अनंत गोलतकर
- किसन वीरकर
- सुखलाल रामलाल बंसकर
- पांडूरंग विष्णू वाळके
- फुलवरी मगरु
- गुलाब कृष्णा खवळे
- बाबूराव देवदास पाटील
- लक्ष्मण नरहरी थोरात
- ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
- गणपत रामा भुते
- अनंत गोलतकर
- किसन वीरकर
- सुखलाल रामलाल बंसकर
- पांडूरंग विष्णू वाळके
- फुलवरी मगरु
- गुलाब कृष्णा खवळे
- बाबूराव देवदास पाटील
- लक्ष्मण नरहरी थोरात
- ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
- गणपत रामा भुते
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा