श्रमाला मिळावे मोल
घामाला मिळावे दाम
कामगारांना मिळो काम
कामाला मिळो सन्मान
सर्वांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… चांगला पगार, चांगली वागणूक, 8 तास काम, पगारी सुट्टी या मागण्यांसाठी 1 मे 1980 ला रक्तरंजित आंदोलने झाली, यांत कामगारांचा विजय झाला. तेव्हापासून 1 मे हा दिवस “आंतरराष्ट्रीय कामगार दिवस” म्हणून साजरा केला जातो. भारतात लेबर किसान पार्टीने 1 मे 1923 रोजी पहिल्यांदा “कामगार दिवस” साजरा केला होता. यासाठी भारतात पहिल्यांदाच कामगार दिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल झेंडा वापरला होता. आज कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांसाठी कायदे प्रत्येक कामगारांना माहित असणे गरजेचे आहे.
किमान वेतन कायदा–
कामगारांच्या कौशल्यानुसार त्यांना वेतन मिळाले पाहिजे.
वेतन देय कायदा–
पेमेंट ऑफ वेजेस अॅक्ट 1936 नुसार, कामगारांच्या मालकाने कामगारांना महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार देणे गरजेचे आहे.
समान मोबदला कायदा–
समान मोबदला कायदा 1976 असे सांगतो की, कारखाना मालक दोन कामगांरामध्ये लिंग, वंश, जात यावरून कोणताच भेदभाव करू शकत नाही.
भविष्य निर्वाह निधी–
या कायद्याचा हेतू कामगारांच्या सेवानिवृत्तीसाठी बचत करणे हा आहे.
कामगार राज्य विमा योजना–
कामावर असताना काही दुखापत होणे, आजारपण, प्रसूती यासंदर्भात कामगारांना ही योजना लाभदायी ठरते. कामगार व त्यांचे कुटुंब यासाठी वैद्यकीय विमा याद्वारे दिला जातो.
बोनस कायदा–
बोनस कायदा 1965 नुसार, कारखानदाराने कामगारांना वेतनाच्या 8.33 टक्के बोनस देणे आवश्यक आहे.
मातृत्व लाभ कायदा–
महिलांसाठी सशुल्क प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे केली आहे. 26 आठवडे पूर्ण झाल्यास कारखाना मालकाच्या परवानगीने ती स्त्री घरून सुद्धा आपले काम पूर्ण करू शकते.
कामगार दिनाचे औचित्य साधून माहिती असणारे कायदे व त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व कामगारांच्या कामाचा गौरव खरोखरच झाला पाहिजे.
सर्व कामगारांना मानाचा मुजरा…..
FAQ
१. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो?
२. भारतात पहिल्यांदा कामगार दिवस कधी साजरा केला गेला?